
*जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीमार्फत माता-भगिनींचा सन्मान*
तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर अंतर्गत ग्रामपंचायत काटगाव येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, आरोग्य सेविका, शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायती अंतर्गत महिला कर्मचारी व गावातील इतर सन्माननीय महिला यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रथमतः माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत काटगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचे स्वागत करून शासकीय परिपत्रकाचे वाचन केले त्यानुसार गावातील हुंडाबळी, बालविवाह, महिला सक्षमीकरण याबाबत माहिती दिली त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थितांमधून माजी जि प सदस्य सौ सुजाता रोकडे आशा कार्यकर्ती सौ अलका माळी सीआरपी उमेद गट सौ रेणुका गंगणे आरोग्य सेविका थोरात मॅडम तसेच मा सरपंच अशोक माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीमती नगीना ताई कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आजच्या महिला जागतिक दिना निमित्ताने महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी एक कविता म्हणून दाखविले. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत सर्व उपस्थित माता-भगिनींचे शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरून सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायती अंतर्गत काम करणारे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले ग्रामपंचायत लिपिक श्री नागनाथ बेटकर व पाणीपुरवठा कर्मचारी श्री अशोक माळी यांचे शाल पुष्पगुच्छ व फेटा बांधून सेवानिवृत्ती बाबत सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कोरोना कालावधीत घरोघरी जाऊन जनजागृती करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कामगिरी केलेले सर्व आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, सीआरपी उमेद गट व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून ग्रामपंचायतीमार्फत रुपये 1000 रोख स्वरूपात देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री सूर्यकांत कांबळे यांनी वैयक्तिक रित्या ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचाऱ्यास प्रत्येकी दोनशे रुपये इतके प्रोत्साहन रक्कम देण्यात आले. त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी मिळून केक कापून आनंद साजरा केला. नंतर सर्व उपस्थित महिला सत्कारमूर्ती यांना अल्पोपहार व चहा पान व्यवस्था करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अशोक माळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री संजय घोगरे, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता खोबरे, श्रीमती नगीना ताई कांबळे, श्री सूर्यकांत कांबळे, आशा गटप्रवर्तक सौ भाग्यश्री हजारे, ग्राम रोजगार सहाय्यक श्री गौतम गोरसे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री प्रशांत मुळे व श्री इरफान शेख हे उपस्थित होते
संकलन श्री संजय घोगरे संचालक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य





