Welcome to HELLO INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to HELLO INDIA NEWS
E-Paperhttps://helloindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifUncategorizedदेशमहाराष्ट्र
Trending

पावसाच्या खंडामुळे शेतकरी अडचणीत; तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री राणा जगजीत सिंह पाटील यांच्या आदेशावरून काडगावसह परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू

उपसंपादक:- मुस्तकीम इस्माईल घाटवाले, संपर्क:-8605402130

पावसाच्या खंडामुळे शेतकरी अडचणीत; तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या आदेशावरून काडगावसह परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू

काडगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव :

तुळजापूर तालुक्यातील काडगाव, चव्हाणवाडी, खडकी, घट्टेवाडी, टेलर नगर तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचा खंड पडल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाची अत्यंत गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून, काही भागात पिकांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.श्री.राणा जगजीत सिंह पाटील यांच्या आदेशावरून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली .

या पाहणीदरम्यान काडगाव जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. निवृत्ती दादा माळी, गावचे सरपंच मा. श्री.अशोक माळी, गावचे पोलीस पाटील मा. श्री.साधू माळी तसेच तालुका सरचिटणीस  मुस्तकीम घाटवाले ग्रामपंचायत सहकारी मित्र प्रशांत मुळे गावातील युवा उद्योजक जलाल तालीकोटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम आणि पुढील काळातील संभाव्य परिस्थिती याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

यावेळी गावातील शेतकरी नवनाथ चेंडके, बब्रुवान कळबांडे,श्रीशैल माळी, दत्तात्रय चेंडके यांच्यासह इतर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार आणि विमा स्पेशलिस्ट राणाजगजितसिंह पाटील यांना शेतकऱ्यांकडून एक (विनंती त्यांनी आम्हा शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती मदत व उपाययोजना करावी), अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!