E-Paperhttps://helloindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

काटगाव येथील जीर्ण पाणी टाकीच्या पाडकामासाठी स्थळ पाहणी

उपसंपादक :-मुस्तकीम इस्माईल घाटवाले

काटगाव येथील जीर्ण पाणी टाकीच्या पाडकामासाठी स्थळ पाहणी

काटगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटगाव येथील जुनी व जीर्ण झालेली पाणी टाकी सध्या धोकादायक स्थितीत असल्याने तिचे पाडकाम करण्याच्या दृष्टीने स्थळ पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान पाणी टाकीची सद्यस्थिती, बांधकामाची जीर्ण अवस्था तसेच परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.

 

यावेळी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील प्राध्यापक श्री. कोनापुरे सर व त्यांचे सहकारी श्री. शिवशेट्टी सर, काटगावचे सरपंच श्री. अशोक माळी, ग्रामविकास अधिकारी श्री. संजय घोगरे तसेच माजी ग्रामपंचायत लिपिक श्री. नागनाथ बेटकर आदी उपस्थित होते.

शाळेच्या आवारातील ही जुनी पाणी टाकी जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिची पाहणी करण्यात आली. स्थळ पाहणीच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही व पाडकामाबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

 

जीर्ण झालेली रचना तातडीने हटविण्याची कार्यवाही झाल्यास शाळेच्या परिसरातील संभाव्य धोका कमी होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!