E-Paperhttps://helloindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

काटगाव येथे तेरणा हॉस्पिटलच्या वतीने यशस्वी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न

उपसंपादक :-मुस्तकीम इस्माईल घाटवाले

  1. # काटगाव येथे तेरणा हॉस्पिटलच्या वतीने यशस्वी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न

**धाराशिव:**

“चला निरोगी धाराशिव घडवूया” हे ध्येय समोर ठेवून आणि धाराशिवच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या आदरणीय श्री पद्मसिंह पाटील व तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार श्री  राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे एका भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

नेरुळ, नवी मुंबई येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या मार्फत सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, काटगाव येथे हे शिबीर पार पडले.

 **मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती**

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आणि मार्गदर्शनपर उपस्थिती खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लाभली:

 कृषी विभाग सभापती सिद्धेश्वर अण्णा कोरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. निवृत्ती दादा माळी,लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन श्री. बालाजी शिंदे, सरपंच श्री. अशोक माळी, शासकीय रुग्णालयाचे डॉ. साईनाथ जळकोटे तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म

 श्री तुकाराम माळी, श्री खंडू पावले, श्री चन्नवीर बेटकर, श्रीशैल माळी, श्री महेश माळी, श्री बाबा बेटकर, श्री राम जवान, श्री इस्माईल घाटवाले,श्री सुदेश हजारे, श्री राहुल नकाते श्री मुस्तकीम घाटवाले यांच्यासह काटगाव शासकीय रुग्णालयाचे सहकारी कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 **नागरिकांचा मोठा प्रतिसाद**

तेरणा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शिबिरात उपस्थित नागरिकांची कसून आरोग्य तपासणी केली आणि गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार व योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!