Uncategorized
धाराशिव येते पोलीस भरतीसाठी आलेल्या विदयार्त्याना राहण्यास व जेवणाची व्य्वस्था
खासदार ओमराजे निंबाळकर (ओमदादा) आणि आमदार कैलास पाटील (कैलास दादा) यांच्या वतीने धाराशिव येथे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस भरतीसाठी दूरदूरच्या भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, त्यांना सुरक्षित निवास मिळावा आणि ते पूर्ण क्षमतेने परीक्षेला सामोरे जावेत, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
- विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏


