E-Paperhttps://helloindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र

काटगावमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; मान्सूनच्या दगाफटक्यामुळे शेतकरी चिंतेत, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून तातडीने शेतशिवारात पाहणी!

उपसंपादक :-मुस्तकीम इस्माईल घाटवाले

काटगावमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; मान्सूनच्या दगाफटक्यामुळे शेतकरी चिंतेत, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून तातडीने शेतशिवारात पाहणी!

काटगाव (प्रतिनिधी) :ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या दीर्घ पावसाच्या खंडामुळे (टंचाईसदृश परिस्थिती) काटगाव परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. पिके धोक्यात आल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि प्रत्यक्ष नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी गावातील सर्व प्रमुख मान्यवर आणि शासकीय अधिकारी यांनी नुकतीच काटगावच्या शेतशिवाराची प्रत्यक्ष पंचनामे केली.

शेतकऱ्यांची भेट आणि पंचनामे दौरा

या पंचनामे दौऱ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती माळी, सरपंच श्री. अशोक माळी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. चंदविर बेटकर यांनी विविध शेतात जाऊन पिकांच्या स्थितीची पाहणी केली. पावसाअभावी सोन्यासारखी पिके कशी जळत चालली आहेत, याचे भीषण चित्र यावेळी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी गावातील पोलीस पाटील श्री. साधू माळी हेदेखील या दौऱ्यात सक्रिय सहभागी झाले होते.

प्रशासन आणि शेतकरी एकत्र

नुकसान भरपाई आणि पंचनाम्यांच्या तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे अधिकारीही तातडीने मैदानात उतरले. तलाठी श्री. दयानंद काळे आणि कृषी सहाय्यक श्री. श्रीकांत दुधभाते यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानाची प्राथमिक पाहणी केली व शासनाकडे तातडीने अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी गावातील ज्येष्ठ शेतकरी दादा महाजन, बब्रुवान कळवंडे तसेच धोत्रीचे माजी सैनिक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिकांच्या उपस्थितीने या संकटसमयी संपूर्ण गावाने एकजुटीचा संदेश दिला.

शासकीय मदतीची आर्त हाक

सततच्या पावसाच्या खंडामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ सदृश पंचनामे करून काटगाव परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी भरीव नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी यावेळी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!